जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांधीनगर गोंदेगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त वारकरी संप्रदायाच्या दिंडीचे आयोजन
गोंदेगाव, १० जुलै (प्रतिनिधी : गणेश मानकरी) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गांधीनगर (गोंदेगाव) येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश श्री संत महात्म्यांचा सांस्कृतिक वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि तो सदैव जपणे असा होता.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना श्री संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या गुरुभक्तीची महती पटवून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी गावातून पारंपरिक वेशभूषेत, टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंडी काढली आणि पावल्या, फुगड्या खेळत आनंद घेतला. या उपक्रमाने गावकऱ्यांची मने जिंकली.
कार्यक्रमास गावातील महिला, ग्रामस्थ आणि पालकवर्गाने उस्फूर्त प्रतिसाद दिला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. हरिदास वाघ सर, शिक्षक श्री. भारत वाघ सर आणि श्री. निवृत्ती भालेकर सर यांनी विद्यार्थ्यांना गुरुंचे महत्त्व समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या सांगतेसाठी शाळेच्या प्रांगणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिकता, संस्कार आणि गुरुभक्तीची भावना वृद्धिंगत करणारा ठरला.
Leave a Reply