घरकुलाचे हप्ते वेळेवर मिळत नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन
क्रांतीभूमी मराठी न्यूज:- अंबड तालुक्यातील सर्व गावातील घरकुल लाभार्थी यांचे मंजूर झालेल्या घरकुलांचे हप्ते लवकर जमा करण्यात यावी यासाठी वंचित बहुजन आघाडी यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय अंबड येथे निवेदन देण्यात आले,अंबड तालुक्यातील घरकुल लाभार्थी यांचे बिल वेळेत मिळत नाही .म्हणून लाभार्थी वारंवार पंचायत समिती कार्यालय अंबड येथे चकरा मारत आहे, कधी संबंधित विभागाचे अधिकारी असते तर कधी अधिकारी नसून बोलून बंद असतो असा आरोप वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष किशोर तुपे निवेदन मध्ये नमूद केला आहे.असे प्रकार वारंवार घडल्या कारणाने वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी यांनी काल दि.17 रोजी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन सबंधित घरकुल लाभार्थी यांचे बिल पुढील 10 दिवसात जमा नाही झाल्यास आपल्या कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
Leave a Reply