गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा

सकल कुणबी मराठा समाज मार्फत गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा आयोजित

क्रांतीभूमी मराठी न्यूज :-  सकल  मराठा समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

गरिबी दूर करण्यासाठी शिक्षणाची गरज, सर्व गोर गरीब प्रत्येक विद्यार्थी चे शिक्षण होणे काळजी गरज होती. आपल्या प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्यामुळे सर्व समाज बांधव एकत्र येऊन अवतार खर्च कमी करून वंचित मुलांना शिक्षणासाठी मदत करावी असे प्रा.भगवान रेगुडे सर म्हणाले.
सर्वांनी पक्ष सोडून समाजासाठी एकत्र येऊन कार्य करावे त्या शिवाय प्रगती होणार नाही , एकीचे बळ दाखवून प्रत्येक विद्यार्थी ला सहकार्य करावे , विद्यार्थी नी सुधा आई वडिलांच्या संघर्ष ची जाणीव ठेवावी . संत महात्मा यांना सुदा जनतेने नाव ठेवले आहे आपण सामान्य माणसाचे काय असे प्रतिपादन उद्घाटन पर जगन्नाथ शेंडगे यांनी केले.
मार्गदर्शक म्हणून महादेव माने सर व डॉ.लक्ष्मण सावंत यांनी मोलाचे असे मार्गदर्शन केले आहे.

या कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनिल निंबाळकर यांनी केले, अध्यक्ष जगन्नाथ डोळस सर, कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून जगन्नाथ शेंडगे , प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीधर थेटे , रघुनाथ भोंडे संतोषराव मोहिते , युवा नेते करण मिठे, बद्रीनाथ गुलगे, संदीप नरवडे व बहुसंख्य विद्यार्थी , पालक उपस्थित होते. आभार प्रदर्शन डॉ.श्रीकांत पायमुडे सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *