फॉर्मर आय डी काढणे अनिवार्य, कृषी विभागाचे आव्हान…

फॉर्मर आय डी काढणे अनिवार्य, कृषी विभागाचे आव्हान…

क्रांतीभूमी मराठी न्यूज, (शब्बीर शेख)

फुलंब्री: भारतीय कृषी विमा कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना पिक विमा योजनेविषयी माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी पाठशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभीक फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोरक्षनाथ याठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी पंचक्रोशीतील उपस्थित शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचे बारकावे तसेच योजनेत समाविष्ट बाबींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. हवामानातील अनियमितता, कीड-रोगराई आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता, अशा नुकसानाची भरपाई मिळवण्यासाठी पिक विमा हा एक प्रभावी पर्याय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी या पाठशाळेद्वारे जनजागृती करण्यात आली. चालू खरीप हंगामासाठी पिक विमा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 असून, शेतकऱ्यांनी त्या आधी सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.त्यावेळी सोसायटी चेअरमन, सदस्य,विमा कंपनी प्रतिनिधी भरत अंभोरे व गावकरी मंडळी उपस्थित होते.

 

तसेच शेतकऱ्यांनी स्वतः जे पीक घेतले आहे त्याच पिकाचा विमा भरावा त्याचप्रमाणे ई-पिक पाहणी करणे आणि “फार्मर आयडी” सादर करणे अनिवार्य असल्याचेही मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *