श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना चौढाळा – रोलर पूजन कार्यक्रम
क्रांतीभूमी मराठी न्यूज,
पैठण तालुका प्रतिनिधी (गणेश थोरे):-
श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना येथे येणाऱ्या २०२५-२६ गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक विधीनुसार रोलर पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व श्रद्धेने पार पडला.
सध्या करखान्यात ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा तसेच मशनरी दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. वेळेत आणि योग्य रीतीने हंगाम सुरू करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समर्पण भावनेने कामाला सुरुवात केली. येत्या हंगामात योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सर्वांचं सहकार्य यामुळे गळीत प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. शेतकरी हित आणि कारखान्याचा यशस्वी हंगाम हेच आपले प्रमुख ध्येय असून, सर्व घटकांची एकजूट आणि परिश्रम हे यशाचे प्रमुख घटक ठरतील.
यावेळी कारखान्याचे चेअरमन तथा पैठण चे आमदार विलास बापू भुमरे सर्व संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
Leave a Reply