अक्षय तूर्तीया दिवशी पिठोरी सिरसगाव येथे अखंड हरीनाम सप्ताह चे आयोजन..
अंबड प्रतिनिधी : अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथे साडेतीन मुहूर्त पैकी असणारा अक्षय तूर्तीया आहे ..ह.भ.प लोटांगणं महाराज पाष्टे यांच्या आशीर्वादाने त्याच दिवशी संत आवडाजी बाबा संस्थान पिठोरी सिरसगाव येथे अखंड हरीनाम सप्ताह दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सूरु करण्यात आला आहे..दिवसाची दिनचर्या सकाळी काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण , गाथा भजन , संगीत रामायण , आणी रात्री 9 ते 11 हरी कीर्तन असे नियोजन गावाकरि माघील काही वर्षापासून करत आहे..गावातील व पंचकृषी गावातील प्रत्येक नागरिक आपल्या काही अखंड हरीनाम सप्ताह मध्ये सेवा करता येईल का यासाठी तरुण वर्ग उपस्तिथ राहतात..
अखंड हरीनाम सप्ताह हा माघील 150 वर्षा हून आधी पासुन् सुरु आहे .असे सेवेकरी ह भ प वाल्मिक महाराज सांगळे सांगतात..
Leave a Reply