गल्हाटी नदीतुन अवैध वाळू उपसा सुरू, महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष…
जालना प्रतिनिधी: – अंबड तालुक्यातील शहापुर , दाढेगाव,रेवलगाव,पिठोरी सिरसगाव येथील गल्हाटी नदी पाञातुन दिवस राञ वाळू उपसा सुरू असुन याकडे माञ महसुल विभाग व पोलीस प्रशासन जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
याला महसूलमधील काही अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा असल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होतांना दिसत नाही.
महसुल विभागाच्या काही पदाधिकार्याशी आर्थीक व्यव्हार करून वाळू उपसा करणार्या कडुन कुणाचीही भीती न बाळगता गल्हाटी नदीच्या पाञातुन ट्रॅक्टरद्वारे राञ दिवस वाळु उपसा सुरु असुन ही वाळु आसपासच्या गावात अव्वाच्या सव्वा भावाने विक्री सुरू आहे.
सततच्या वाळु उत्खननामुळे गल्हाटी नदी मध्ये मोठमोठे खड्डे पडले असुन मोठमोठ्या खड्डयानी नदी पाञाची चाळणी झाली आहे.
गल्हाटी नदीपात्रात कोणत्याही प्रकारचा लिलाव अथवा परवानगी नसतानाही दिवसाढवळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करणार्यावर व त्यांना अभय देणार्या आधिकार्याची वरीष्ठानी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरीत आहे.
एकिकडे अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी गोदावरी नदी पात्रातुन अवैध वाळू उपसा करणार्या विरूद्ध कारवाई चा विडा उचलला आहे मात्र गल्हाटी नदीपात्रातून होणार्या अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी महसुल विभागाने जाणीवपूर्वक साफ दुर्लक्ष केले आहे.महसुल व पोलीस प्रशासनातील काही अधिकारी व वाळू माफिया यांच्यात होणाऱ्या आर्थिक देवाणघेवाणी मुळे तालुक्यात सर्वत्र होणारी वाळु विरोधी कारवाई मात्र गल्हाटी नदि पात्रात दिसुन येत नाही.तरी अंबड तहसीलदार याकडे लक्ष घालून गल्हाटी नदि पात्रातुन अवैध वाळू उपसा करणार्या विरूद्ध कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याविषयी क्रांतिभूमी मराठी न्युज चे प्रतिनिधी यांनी अंबड तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता , त्याच्या शी संपर्क होऊ शकला नाही.
Leave a Reply