दहावी परीक्षेत ओम शांती विद्यालयातून कु .साक्षी कसार सर्वप्रथम
एस.एस.सी बोर्ड परीक्षेत ओम शांती विद्यालयातून कु .साक्षी कसार सर्वप्रथम
क्रांतीभूम मराठी न्युज: – अंबड तालुकायतील ओम शांती विद्यालय मध्ये शहापूर येथील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी कु.साक्षी वसंत कसार 85.60 टक्के गुण घेऊन विद्यालयातून सर्वप्रथम आलेले आहे. आई वडील भूमीहीन असून कुटुंबाचा उदरनिर्वाह वडील ट्रक ड्रायव्हर ची खाजगी नोकरी करतात. आई शेतमजुरीचे काम करते. सर्वसामान्य परिस्थिती असूनही आर्थिक काटकसर करून तिच्या वडिलांनी दोन मुली आणि एक मुलाचे शिक्षण करत आहे .त्यांनी मोठ्या मुलीचे बारावीपर्यंत शिक्षण दिले व लग्न केले.
साक्षीला पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेतून पोलीस इन्स्पेक्टर होण्याची तिची इच्छा आहे.
कु.साक्षीला मिळालेल्या यशा बद्दल तिच्या राहत्या घरी जाऊन तिच्या सह आई-वडिलांचा सत्कार करून मिळालेल्या बद्दल शुभेच्छा देण्यात आल्या आहे.याप्रसंगी शिक्षक भगवान रेगुडे सर, शिवाजी देवकर सर, शहापूर गावचे सरपंच कैलास माने, राधाकृष्ण मैद, श्यामसुंदर माने, सोमनाथ साळुंखे , जयराम माने , दत्ता शेलकर, दत्ता घीगे, ज्ञानेश्वर साळुंखे, नामदेव साळुंखे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a Reply