महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या परभणी जिल्हाध्यक्ष पदी मारोती गडदे यांची नियुक्ती
क्रांतीभूमी मराठी न्यूज प्रतिनिधी:- राज्यात महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस कार्य करण्यात येत असून या कार्यात अधिकाधिक भर पडावी यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नियुक्त्या देण्यात येत आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत दिसून येत आहे आर्थिक तारतम्य यामध्ये दिसत नाही अवकाळी पावसामुळे व प्रशासनच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मोहाडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील मारोती पंडीतराव गडदे यांची परभणी जिल्हाध्यक्ष म्हणून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी आज रोजी नियुक्ती पत्राद्वारे केली.
आपण एक शेतकरी पुत्र असून आपण शेती व शेतकऱ्यांच्या हितासाठी परिसरातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणे कामी काम करण्यासाठी परभणी जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात येत असल्याचा उल्लेख असून संघटनेला मजबूत करण्यासाठी संघटनेचे ध्येय धोरणे व विचार सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार वर्ग यांच्यापर्यंत पोहचून शेतकरी हीत जपणार अशी अपेक्षा राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांनी व्यक्त करून पुढील कार्यकारणी पंधरा दिवसाच्या आत घोषित करून संघटनेच्या कार्यालयात पाठवावी असे नमूद केलेले आहे.
श्री मारोती गडदे यांची परभणी जिल्ह्यातील संघटनेचे सर्व कार्यकर्ते सदस्य यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या परभणी जिल्हाध्यक्ष पदी मारोती गडदे यांची नियुक्ती

Leave a Reply