गोंदी तांडा (वैतागवाडी) येथे गोंदी पोलिसांवर दगडफेक

गोंदी तांडा (वैतागवाडी) येथे गोंदी पोलिसांवर दगडफेक

दोन पोलिस कर्मचारी जखमी,

क्रांतीभूमी मराठी न्युज

तालुका प्रतिनिधी;-( अशोक गायकवाड ) दुचाकी चोरीमधिल संशयित आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या गोंदी पोलीसांवर दगडफेक झाल्याची घटना अंबड तालुक्यातील गोंदी तांडा येथे शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे.
: गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किरण हावले जमादार अशोक नागरगोजे, जमादार चरणसिंग बामणवात, पोलिस कर्मचारी शाकेर सिद्दिकी हे शनिवारी 11 वाजता त गोंदी तांडा येथिल दुचाकी चोरीमधिल संशयित आरोपीस पकडण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी संशयित दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला राहत्या घरातून पकडलेले होते यावेळी दोन पुरुष व एक महिला यांनी तुफान दगडफेक केली यामध्ये पोलिस कर्मचारी शाकेर सिद्दिकी यांना डाव्या हाताल तर अशोक नागरगोजे यांना पायाल दगड लागला यावेळी त्यांनी पकडलेला आरोपी सुटला असता त्यांला उपनिरीक्षक किरण हावले यांनी त्यांची स्वता: च्या मालकीची कार पकडण्यासाठी काढलेली असतांना तिघां जणांनी मेन्यू कार क्र.एम.एच‌.25 बी.ए.2226 ला दगडे मारील यामध्ये कारच्या पाढिमागील काच फोडून दगडे कारमध्ये आली. दगडफेक करत याठिकाणी वरील तीन पुरुष व दोन महिला फरार झालेल्या आसून, हाता पायाला दगडे लागल्याने शहागड प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. वैष्णवी नरवडे यांनी अशोक नागरगोजे,शाकेर सिद्दिकी यांच्यावर उपचार केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *