भाजपा शहर जिल्हाध्यक्षपदी भास्कर आबा दानवे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना 

भाजपा शहर जिल्हाध्यक्षपदी भास्कर आबा दानवे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना माजी  सरपंच निवृती गायकवाड
रामनगर प्रतिनिधी : (रामदास गायकवाड) राज्यात महायुती सरकारने विधानसभेच्या काळात आपले उमेदवार बहुमताने निवडून आणून महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता स्थापन करण्यात आली. त्यामध्ये मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी सर्वात जास्त उमेदवारांनी निवडून आलेला पक्ष ठरलेला आहे.

आगामी स्थानिक निवडणुका लक्षात घेता विश्वासू कार्यकर्ते आमदार, लोकप्रतिनिधी यांना आगामी विधानसभेच्या तोंडावर महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी निवड करण्यात आलेली त्यामध्ये भाजपा शहर जिल्हाध्यक्षपदी भास्कर आबा दानवे यांची निवड करण्यात आलीअसुन् ठिकठिकाणी त्यांचे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले तसेच मौजपुरी येथील माजी सरपंच निवृत्ती गायकवाड यांनी त्यांच्या निवडीबद्दल सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *