सामाजिक बांधिलकी म्हणून दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव

सामाजिक बांधिलकी म्हणून दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव

कुणबी मराठा समाजातील दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील सर्वच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी नोंद करावी

सकल कुणबी मराठा समाजाच्या शैक्षणिक इतिहासात प्रथमच गुणवंत विद्यार्थ्यांना रोख स्वरूपाचेबक्षीस देण्यात येणार आहे. यासाठी सकल कुणबी मराठा समाजाच्या वेबसाईटवर लिंक द्वारे नोंदणी झालेल्यासर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपयोगी साहित्य बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात येणार आहे.गुणगौरव सोहळ्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून
समाज बांधवांना आर्थिक योगदान साठी आव्हान केले. शिक्षणप्रेमी बांधवांनीमोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. दहावी ,बारावी बोर्ड परीक्षेत सकल कुणबी मराठा समाजातून प्रथम, द्वितीय ,तृतीय, तसेच प्रत्येक तालुक्यातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस देण्यासाठी आर्थिक योगदान करणाऱ्या सर्व समाज बांधवांची नावे ग्रुप वर जाहीर केलेले आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळण्यासाठी समाज बांधवांच्या आर्थिक योगदान जाहीर केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! योगदान प्रेरणादायी व अनमोल ठरेल!
समाजातील शैक्षणिक परिस्थिती आढाव घेऊन समाजातील गरजवंत गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याच्या उदात्त उद्देशाने सकल कुणबी मराठा समाजाचा स्नेह मेळावा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम करण्याचं आयोजन नियोजन चालू आहे.
सकल कुणबी मराठा समाजाच्या वेबसाईटवर लिंक वर फक्त गुणवंत विद्यार्थी नोंद करत आहे. सकल कुणबी मराठा समाजाची
शैक्षणिक दिशा आणि दशालक्षात येण्यासाठी सर्वच उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नोंद करावी. सर्वच विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा* होऊन सर्वांना
शैक्षणिक प्रोत्साहन मिळण्यासाठी बक्षीस स्वरूपाची कौतुकाची थाप समाजाच्या स्नेह मेळाव्यातून मिळणार आहे!
सकल कुणबी मराठा समाजाच्या प्रत्येक गावात ,प्रत्येक घरात, प्रत्येक समाज बांधवाला प्रत्यक्ष भेटून संदेश देणे शक्य नाही. आधुनिक तंत्रज्ञांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या विविध माध्यमामुळे जग जवळ येत आहे. आपण सकल कुणबी मराठा समाजाला शैक्षणिक प्रगती करण्यासाठी एकत्र आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न करू हा संदेश प्रत्येक समाज बांधवांपर्यंत सामाजिकभान समाजाचा अभिमान म्हणून पोहोचण्यासाठी
सहकार्य करावे.सकल कुणबी मराठा समाजाच्या वतीने विनम्र आवाहन!

विनम्र आवाहन
सकल कुणबी मराठा समाज महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *