पंचायत समिती अंबड येथे घरकुल योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप.
क्रांतिभूमी मराठी न्युज: – केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या विविध जनकल्याणकारी योजना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, यशवंतराव चव्हाण आवास योजनेअंतर्गत प्रत्येकांना घर मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र रोजची डोकेदुखी असणारे इंजिनिअर ऑपरेटर यांच्या मनमानी करत घरकुल लाभार्थी यांनी पैसे दिले तरच बिल काढत आहे असा आरोप तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत दाढेगाव येथील श्याम साळवे यांनी केला आहे. जुन्या घरासाठी वीस ते पंचवीस हजार दिले तर लाभार्थ्यांना पैसे टाकण्यात येते तसेच नवीन घर बांधून सुद्धा पैसे टाकण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात असा गंभीर आरोप श्याम साळवे यांनी केलेला आहे. पुढील आठ दिवसात चौकशी नाही झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. सदरील तक्रार बाबत इंजिनिअर पंचायत समिती अंबड यांच्या शी संपर्क केला असता त्यांनी कॉल न उचलता आपली धन्यता मानली आहे.
पंचायत समिती अंबड येथे घरकुल योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप.

Leave a Reply