अनुदान घोटाळा प्रकरणी दोषी कर्मचारी यांना सेवेतून् बडतर्फ करा..
क्रांतीभूमी मराठी न्युज :- जालना जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदानामध्ये ग्रामसेवक ,कृषी अधिकारी, तलाठी यांनी शेतकऱ्यांच्या अनुदानावर डल्ला मारला होता त्यातील काही अधिकारी आता पैसे जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे जमा करत आहे असा विश्वास छावा संघटनेने केलेला आहे त्यांनी अवधरित्या कमावलेली मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांना सेवेतून बडतर्फ करावे असे निवेदन तहसील कार्यालय अंबड तहसीलदार चव्हाण साहेब यांना देण्यात आलेले एकीकडे होत असलेली शेतकऱ्याची पिळवणूक त्याचा कोणता ना विचार करता अधिकाऱ्यांनी मढ्यावरच लोणी खाल्या शिवाय राहत नाही तसाच प्रकार जालना जिल्ह्यात केला होता जवळपास 57 कोटीचा घोटाळा या अतिवृष्टी अनुदानात सोडीत आलेला आहे, आज शेतकरी अनुदान पासून वंचीत आहे, KYC करून दोन महिने होत आहेत परंतु शेतकऱ्याच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. दोषी कर्मचारी यांच्या वर अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आल्याचे दिसत नाही. त्यामुळे छावा संघटना आक्रमक होऊन तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे.
यावेळी संघटनेचे शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष शिवनाथ पाटील काळवणे ,अंबड तालुका अध्यक्ष उमेश गव्हाणे, घनसांवगी तालुका अध्यक्ष नानासाहेब पाटील जोगदंड,तालुकाध्यक्ष युवक बळीराम सपकाळ,
जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा पाटील कचरे,शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष नामदेव जाधव, अंबड शहराध्यक्ष गणेशजी लोहकरे,
सुरेश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते
अनुदान घोटाळा प्रकरणी दोषी कर्मचारी यांना सेवेतून् बडतर्फ करा..

Leave a Reply