सामाजिक कार्यकर्ते माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ जि उप अध्यक्ष बाबासाहेब खरात यांच्या मागणीला यश
शंभर रुपयाचे मुद्रांक विक्रीसाठी उपलब्ध करण्याचे जिल्हा निबंधकांचे आदेश
प्रतिनिधी/ शहागड (बबलू भाई काद्री)
अबंड तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शंभर रुपयाच्या मुद्रांक बाॅड मिळत नसल्याने छोटा,मोठा कामासाठी पाचशे रुपयाचा मुद्रांक बाॅड घ्यावा लागत असल्याने आर्थिक मृदंड सोसावा लागतो या कारणाने सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब हरीभाऊ खरात यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी जालना यांना मुद्रांक विक्रीची बाबद्चे निवेदन सादर करत सातत्याने मागणी केली केली होती की,अंबड तालुक्यात १०० रुपये किंमतीचा मुद्रांक विक्रेते यांनी मागणी केलेली असून मुद्रांक विक्रेते देण्यास टाळाटाळ करत असुन सदर मुद्रांक विक्रेते हे शासनाच्या धोरणानुसार मुद्रांक किंमत ५०० रुपये पेक्षा कमी मुद्रांक देता येत नाही. असे सांगत आहेत परंतु प्रत्यक्षात शासन नियमानुसार मुद्रांक किंमत १०० रुपये किंमतीचे मुद्रांक विकु नये असे कोठे हि परिपत्रकामध्ये आढळत नाही. काही कामांकरिता ५०० रुपये किंमतीचे मुद्रांक शुल्क वापरण्यात यावे असे नमुद करण्यात आले आहे.
तरी या मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी सर्व मुद्रांक विक्रेते यांना आदेशीत करुन १०० किंमतीचे मुद्रांक विक्री करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब हरिभाऊ खरात यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करत शेतकरी व सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या असुदेबाबतच्या मागणीबाबत सहाय्यक निबंध यांच्या आदेशान्वये सहाय्यक दुय्यम निबंधक यांना आदेश देत शंभर रुपयाचे मुद्रांक विक्री करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहे.
शंभर रुपयाचे मुद्रांक विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याबद्दल सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक पिळवणूक यामुळे थांबणार आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब खरात यांनी आवाज उठवत योग्य मागणी केल्याबद्दल व त्यांनी केलेल्या मागणीला यश आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
Leave a Reply