मनमंदिर सेवा प्रकल्प वर्धापन दिनानिमित्त सेवा गौरव पुरस्कार संपन्न..
क्रांतीभूमी मराठी न्यूज :- अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे मागील तीन वर्षापासून सद्गुरु ज्ञानानंद सरस्वती सेवा संस्था संचलित, बेवारस मनोरुग्णाच्या हक्काचे घर म्हणून मनमंदिर प्रकल्प मागील काही वर्षा पासून सुरू आहे त्याचे समाजसेवक म्हणून माधव पवार व त्यांच्या सौभाग्यवती सविता पवार हे बेवारस मनोरुग्णाची आपल्या कुटुंबातील सदस्या पलीकडे सेवा करतात.
काल दिनांक 24 मे 2025 रोजी मंदिर प्रकल्पाला तीन वर्षे पूर्ण होत आहे त्यानिमित्त गौरव पुरस्कार आयोजित करण्यात आला होता त्याचे उद्घाटक म्हणून माननीय श्री .श्रीकृष्ण पांचाळ साहेब जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय जालना,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिकमत दादा उढान ,तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ.श्री. नारायण भाऊ कुचे आमदार अंबड बदनापूर विधानसभा, मा.श्री .विश्वजीत भैया खरात अध्यक्ष ओम शांती ज्ञानमंदिर शिक्षण संस्था अंबड , मा.श्री. प्रशांत उढाण प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. डॉ.प्रकाश आंबेकर मानस हॉस्पिटल जालना. मा. श्री .रामकुमार अग्रवाल लक्ष्मी स्टील जालना, मा. श्री सुभाष काळे समाजसेवक उमापूर, श्री. राजू छल्लारे सर, श्री. देवकर सर
तसेच या कार्यक्रमादरम्यान सेवा गौरव पुरस्कार ती माननीय श्री .डॉ. गिरीश कुलकर्णी संस्थापक स्नेहालय अहिल्यानगर, मा. श्री दादासाहेब थेटे संस्थापक समाजभान टीम ,मा. श्री. निलेश लोहिया समाजसेवक माने श्री अजय् किंगरे मैत्री मांदेयालि आणि मा. श्री .फिरोज पठाण राज्य समन्वयक आर्ट ऑफ लिंक यांचे पुरस्कार देऊन सत्कार समारंभ संपन्न झाला.त्यावेळी पंचक्रोशीतील नागरिक, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Leave a Reply