समृद्धी साखर कारखाण्याचा ह्यावर्षी चा उच्चांकी दर
क्रांतीभूमी मराठी न्युज: – माघील दोन वर्षात मराठवाडात सर्वात जास्त उसाला भाव देणारा कारखाना म्हणजे समृद्धी शुगर कारखाना ठरला आहे. भाजपा नेते सतीश घाडगे पाटील यांनी शेतकऱ्याचे हित जोपासत आपल्या कारखानकडून जास्तीत जास्त भाव देण्याचा विक्रम केला आहे. प्रत्येक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकरी यांच्याशी संवाद सांधून संकटाच्या काळात मदतीला धावणारा समुद्धी साखर कारखाना ठरला आहे..ह्या वर्षी उसाचा पहिला हप्ता २५०० रु देऊन अंतिम बिल २९७० रु आज रोजी समुद्धी साखर कारखान्याचे चेअरमन श्री सतीश घाडगे पाटील यांनी जाहीर केला आहे. दुसरा हप्ता पुढील २ ते ३ दिवसात २०० रु नी वाढीव बिल खात्यावर जमा होणार असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे,
तसेच तिसऱ्या हप्ता बाबत सुधा लवकर निर्णय घेऊ असे घाडगे पाटील यांनी म्हंटले आहे. त्यामुळे नक्कीच अडचणीच्या काळात ह्या पैसाचा खरीप पेरणी साठी उपयोग होईल.शेतकरी बांधवाने समुद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाडगे पाटील यांचे कौतुक केले आहे.
Leave a Reply