पिठोरी सिरसगाव सह परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने गल्हाटी नदीला पूर
क्रांतीभूमी मराठी न्युज: – राज्यात माघील दहा दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे..त्यामुळे शेतकऱ्याची धांदल उडाली आहे, आज दी. २६ मे ला दुपारी पावसाने जोरदार सुरुवात केली, तब्बल २ तास पाऊस असल्यामुळे सगळी कडे पाणीच पाणी केले , शेताला तळ्याचे प्राप्त झले होते , त्यामुळे गल्हाटी नदीला पावसाळा सुरु होताच नदीला पूर आला आहे. मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने उन्हाळी बाजरी, कांदा, आंबा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,तोंडाशी आलेला घास हिसाकून जाण्याच्या मार्गांवर आहे,बाजरी ला कणासाला कोंब भुटले आहे,पावसाने विश्रांती नाही दिली तर आलेले पिक पूर्णपणे मातीत जाईल यांची चिंता शेतकऱ्याला पडली आहे.पुरामुळे खालवलेली पाणी पातळीत नक्कीच वाढ होईल अशी चर्चा शेतकरी वर्गात आहे.
Leave a Reply