उमेद अभियान- स्वराज्य महिला प्रभागसंघ लिंबा यांची आढावा बैठक संपन्न..
पाथरी प्रतिनिधी ( श्रीनिवास शेवतकर) :– महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत महिलांच्या स्वयंरोजगारासाठी क्षमता बांधणी, कौशल्यवृद्धी काम करण्यात येत असून, महिलांना बाजारपेठही उपलब्ध करून देण्याचे काम सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतीशा माथूर , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर व जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री. दीपक दहे तालुका अभियान व्यवस्थापक श्री संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
तसेच प्रभागाला मिळालेल्या वेगवेगळ्या निधीचा आढावा यावेळी घेण्यात आला. या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रभागामध्ये एकूण 14 ग्रामसंघ आणि 246 महिला बचत गट कार्यरत आहेत. यामध्ये जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष परभणी यांच्यामार्फत स्वराज्य महिला प्रभागसंघातील एकूण कार्यरत 226 समूहांना 1 कोटी 35 लक्ष 60 हजार रुपये निधी समूहातील महिलाना शाश्वत उपजीविका याकरिता देण्यात आला आहे.तसेच बँकेच्या माध्यमातून एकूण 3 कोटी 10 लक्ष रुपये लिंबा प्रभागातील स्वयं सहाय्यता समूहातील महिलाना वितरित करण्यात आलेला आहे. या निधीच्या माध्यमातून स्वय सहाय्यता समूहातील महिलांनी विविध उद्योग व्यवसाय उभारले आहेत.या उद्योग व्यवसायातून कुटुंबाला आर्थिक मदत होत आहे.
उद्योग व्यवसायातून महिला लखपती होण्यासाठी मागील आर्थिक वर्षात लिंबा प्रभागासाठी 915 लखपती दीदी महिला तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते ते महिलांनी चालू केलेल्या उद्योग व्यवसायामुळे साध्य झाले आहे. असे अनेक उपक्रम उमेद अभियानाच्या माध्यमातून राबविले जातात व ग्रामीण भागातील महिलाना सक्षम व समृद्ध करण्यास कौशल्य प्रशिक्षण राबविले जातात. या आढावा बैठक प्रसंगी ग्रामीण भागातील महिलाना विविध उद्योग व्यवसाय बद्दल तसेच प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना,प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना,प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अशा अनेक 35% सबसिडी व वयक्तिक उद्योग व्यवसाय बाबत मार्गदर्शन आजच्या आढावा बैठकी प्रसंगी करण्यात आले .
त्यावेळी तालुका व्यवस्थापक श्री बाबासाहेब वाघमारे प्रभाग समन्वयक झरेकर , साखरे , श्रीनिवास शेवतकर यांनी केले.त्यावेळी उपस्थित गावच्या सरपंच मीरा चव्हाण, प्रभागसंघ अध्यक्ष चैताली नवले,प्रभागसंघ सचिव रंजना नवघरे प्रभाग संघ लेखापाल अश्विनी आडसकर व सर्व 12 गावातील ग्रामसंघ पदाधिकारी लिंबा प्रभागातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती उपस्थित होत्या
Leave a Reply