मराठा- कुणबी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : ‘ सार् थी शिष्यवृत्ती योजने’साठी १६ जूनपर्यंत अर्ज करा!
क्रांतीभूमी मराठी न्युज: – मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत देणारी “महाराजा सयाजीराव गायकवाड – सरथी गुणवंत मुला-मुलींसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना” लागू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
अर्ज प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा:
इच्छुक विद्यार्थ्यांनी fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ जून २०२५ आहे.
शिष्यवृत्तीचे स्वरूप:
योजनेअंतर्गत शिक्षण शुल्क, निवास भत्ता आणि वैद्यकीय आरोग्य विम्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल ३० लाख रुपये, तर पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी कमाल ४० लाख रुपये शिष्यवृत्ती स्वरूपात दिले जाते.
योजनेचा उद्देश व ध्येय:
या योजनेचा उद्देश मराठा, कुणबी वर्गातील विद्यार्थ्यांना परदेशातील दर्जेदार विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवून देणे आणि त्यांना जागतिक स्तरावर सक्षम करणे आहे. यामध्ये पदव्युत्तर पदवी/पदविका आणि पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे ५० व २५ जागा आहेत.
Leave a Reply