पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी
क्रांतीभूमी मराठी न्युज,
रामनगर (प्रतिनिधी): जालना तालुक्यातील मौजपुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी चालवलेले प्रशासन आजच्या पिढी ला अतिशय प्रेरणादायी आहे.
जालना पंचायत समिती माजी सभापती पांडुरंगदादा डोंगरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सरपंच बद्रीभाऊ भसांडे, माजी सरपंच निवृत्तीराव गायकवाड, युनियन कृषकचे संचालक राजीव महाडिक, माजी संचालक सुधाकर ढोकळे,माजी सरपंच दिपक डोंगरे, माजी सरपंच सिध्दार्थ मोरे, माजी उपसरपंच प्रभाकर डोंगरे, माजी उपसरपंच नारायण डोंगरे, विश्वनाथ डोंगरे, अरुण डोंगरे, ग्रा.प.सदस्य आप्पासाहेब डोंगरे, संतोष मोरे, राम जाधव, भागवत बळप, संजय महाडिक, विष्णु गायकवाड,बालाजी बळप, कैलास डोंगरे, सावळाराम नेमाने, रामदास गायकवाड, बबन कऱ्हाळे, सुनिल मोरे, सुरेश देशपांडे,बाळाभाऊ लोकरे, बद्रीभाऊ शेजुळ, सुर्यकांत गायकवाड,शिवहरी मुळे, लक्ष्मण गोरे,वैजिनाथ वीर, वामनराव गायके, पांडुरंग नेमाने,हरिकिशन मुळे, सचिन पंडित, अर्जुन पवन, गणेश काळे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply