गोदावरी नदीपात्रात बुडून एक जणांचा मृत्यू 

गोदावरी नदीपात्रात बुडून एक जणांचा मृत्यू 

क्रांतीभूमी मराठी न्युज,

अंकुशनगर प्रतिनिधी (गणेश वाघमारे) :-  अंबड तालुक्यातील डोमलगाव येथील तरुण गोदावरी नदीत पोहण्या  साठी गेला असता पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडले ज्ञानेश्वर भाऊसाहेब खरात असे मृत मुलाचे नाव आहे.

आयटीआयमध्ये घेत होता शिक्षण

डोमलगाव येथील ज्ञानेश्वर खराद तरुण हा एकुलता मुलगा होता. तो आयटीआयच्या पहिल्या वर्षाला होता. शनिवारी सकाळी तो पोहण्यासाठी गोदावरी पात्रात गेला. मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

खड्ड्यांनी केला घात

गोदावरी नदीपात्रात वाळूउपशामुळे खड्डे झाले आहेत. तो युवक खड्ड्यात गेल्याने आणि उखड्ड्यांमध्ये पडलेल्या केनीच्या दोऱ्यांना अडकल्याने बुडाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. खराद कुटुंबातील एकुलत्या एक मुलाचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याने आईवडिलांचा आधार हरपला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *