कोठाळा खु.येथे खरीप पूर्व पेरणी चे प्रात्यक्षिक..
क्रांतीभूमी मराठी न्युज,
अंकुशनगर प्रतिनिधी ( गणेश वाघमारे) :-
मान्सून काही दिवसावर बरसणार त्यापूर्वी मौजे कोठाळा खु तालुका अंबड येथे खरीप हंगाम मोहीम अंतर्गत मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली जाते त्या अनुषंगाने खरीप हंगाम पूर्व नियोजन 2025 कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तालुका कृषि अधिकारी अंबड , श्री बाळासाहेब गंडे, मंडळ कृषि अधिकारी शहागड, श्री गणेश वाघ यांच्या मार्गदर्शना खाली सौ. शुभांगी शिंदे उप कृषि अधिकारी शहागड यांनी बीजप्रक्रिया आणि सोयाबीन उगवणारी क्षमता प्रात्याक्षिक करताना सांगितले की, सोयाबीन बियाणे तपासूनच पेरणी करावी असा सल्ला दिला, तसेच सहाय्यक कृषि अधिकारी, विजय जाधव यांनी खरीप हंगाम मोहीम विषयी
शेतकरी बांधव यांना अॅग्रीस्टॅक (फार्मर आयडी)
विषयी सविस्तर माहिती दिली आणि कृषि विभागाचे महाटीबीडी, आणि हुमणी अळी विषयी शेतकऱ्यांना सोपे भाषेत समजेल अशा सर्व योजना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित शेतकरी, श्री किरण गुळवणे, महेंद्र केदारे, शिवाजी उगले, कृष्णा धाये, कृष्णा सगळे, ज्ञानदेव बाबसे, सचिन गुळवणे, परमेश्वर गुळवणे, मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते….
Leave a Reply