गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांचे सामूहिक जलसमाधी आंदोलन

शेतकऱ्यांच्या विविध समस्या व मागण्यासाठी गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांचे सामूहिक जलसमाधी आंदोलन

गोंदी गोदावरी नदी पात्रात मागण्या मान्य होई पर्यंत जिल्ह्यातील शेतकरी करणार जलसमाधी आंदोलन

क्रांतीभूमी मराठी न्युज,

महायुती सरकारच्या फसव्या आश्वासना नंतर शेतकऱ्यांच्या विविध समस्या व मागण्यासाठी अंबड तालुक्यातील गोंदी येथील गोंदेश्वर मंदिरा जवळील गोदावरी नदीत पात्रात दि. 9 जून रोजी 12 वाजता शेतकरी सामूहिक जलसमाधी आंदोलन करणार आहे या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना जालना जिल्हातील
शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की VK नंबर त्वरित उपलब्ध करूण देणे व अनुदान रक्कम जमा करणे, कॅच होऊन खूप दिवस उलटले आहे तरी शेटजऱ्याच्या खात्यात अनुदान जमा होत नाही, पिक विमा सन २०२४ वाटप करणे, ज्या शेतकऱ्यांनी सोलर साठी ऑनलाईन पेमेंट करून रिजेक्ट केले त्यांचे पैसे परत करणे तसेच जुने मागील सोलर दुरुस्तीच्या सुविधा उपलब्ध करून देणे,पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कार्यालयी नियमित हजर राहणे,पिकाच्या निकषाप्रमाणे पीक कर्ज वाटप करणे, थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांना येणारी विविध योजनेची रक्कम अकाउंट होल्ड काढून देणे,शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणारी डीपी, पोल, तारा किंवा अन्य उपकरणाची तात्काळ दुरुस्ती करणे.
इत्यादी प्रकारच्या समस्यामुळे जालना जिल्ह्यातील सर्व शेतकरी मेटा कुठीस आला आहे व पुढील काही दिवसात खरीप २०२५ ची पेरणी सुरू होणार असून त्याकरिता शेतकऱ्यांना बियाणे खते घेऊन पेरणीसाठी लावयचे असून त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान विमा इत्यादी योजनेच्या माध्यमातून येण्याची रक्कम पुढील दिवसात मार्गी लावणे अन्यथा शेतकरी येणाऱ्या सोमवारी दि 9 जून रोजी गोदावरी नदीच्या पात्रात सामुहीकरित्या ठीक १२ वाजल्यापासूनते मागण्या मान्य होई पर्यन्त जलसमाधी आंदोलन करणार आहोत. व त्या आंदोलनाच्या दरम्यान आंदोलकांना काही इजा झाल्यास व जीवित आणि धोका निर्माण झाल्यास त्यास संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील.
अश्या विविध मागण्या सकल शेतकरी बांधव जालना जिल्हाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर शरद दिनकर सोळुंके, गजानन रामनाथ उगले, पांडुरंग गात, संभाजी मरकड, विनोद मरकड, कैलास सोळुंके, शेखर सोळुंके, अनिल मरकड, दत्तात्रय जाधव, गंगाधर जोशी,अर्जुन बनगे, भिवराज बनगे, शहाजी सोळुंके, अंगत मरकड, कृष्णा सोळुंके, विनोद सोळुंके आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *