मोफत बी – बियाणे वाटप मध्ये गोंधळ कृषी विभागावर शेतकऱ्याचा आक्रोश..
क्रांतीभूमी मराठी न्युज,
महाडीबीटी पोर्टल अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मोफत बी- बियाणे साठी अर्ज दाखल केले होते, असे 280 पात्र शेतकऱ्यांना आज रोजी अंबड तालुका येथे बोलवण्यात आले होते, काही शेतकऱ्यांना मात्र 75 किलोचा बी – बियाणे साठी पात्र म्हणून sms आला पण शेतकरी पात्र असताना पॅकिंग नसल्याच्या कारणावर शेतकऱ्यांना 60 किलो बियाणे वर समाधान मानावे लागले परंतु आम्ही जेवढ्या बी बियाणे साठी पात्र आहोत तेवढे आम्हाला मिळावे, असे शेतकरी भागवत उढाण याचे म्हणणे होते. तर काही शेतकऱ्यांनि कृषी अधिकारी यांना तक्रार केली असता तात्काळ कृषी अधिकारी पोहोचले असता शेतकऱ्याचे म्हणणे ऐकून घेतले त्यावर कृषी अधिकारी यांची प्रतिक्रिया ज्या शेतकऱ्यांना आज रोजी बियाणे पाहिजे त्यांना 60 किलो देण्यात येईल व ज्या शेतकऱ्यांना वाढ ीस बियाणे पाहिजे संबंधित पॅकिंग पॅकिंग उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पुढील दोन दिवस प्रतिक्षा करून तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी 66 किलो बियाणे 22किलो प्रति बॅग नुसार देण्यात येईल व उर्वरित प्रती शेतकरी यांच्या माघे 9 ते 8 किलो बियाणच काय? तर प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्याची यादी आल्यावर त्यांना देण्यात येईल असे सर्व शेतकऱ्यां समोर स्पष्ट तालुका कृषी अधिकारी यांचे म्हणणे आहे.
Leave a Reply