बारासवाडा येथे मुलांना पुष्पगुच देऊन जिल्हा परिषद शाळेने केले स्वागत..
क्रांतीभूमी मराठी न्यूज: (पंढरीनाथ माळकरी) बारसवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत पाटया पुस्तक व गणवेश वाटप तसेच नवगत विद्यार्थ्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत मौजे बारस वाडा तालुका अंबड जिल्हा जालना येथील जिल्हा प्राथमिक शाळेत दिनांक १६-६- २०२५ रोजी सकाळी मुलांची शाळेच्या प्रवेश द्वारा जवळ पाया गड्या घालून व शाळे विद्यार्थ्यांना फेटा बांधून हातामध्ये गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले गावामध्ये फेरी काढून मुलांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाठवा यावेळी असा संदेश देण्यात आला
शालेय समितीचे अध्यक्ष राधाकिसन सावंत यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी शाळेतील शिक्षक कुलकर्णी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन खोंडे सर यांनी केले यावेळी मुख्याध्यापक जाधव सर सावंत सर गोल्हार सर खोंडे सर जाधव मॅडम अंगणवाडी सेविका लताताई मुळे शिवा माने गीता सुळे व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
Leave a Reply