🔸 *कष्टकरी ठेवीदाराचं आत्महत्याच कारण
🔹 भ्रष्ट राजकीय व्यवस्था सर्वसामान्य माणसाचा बळी घेत आहे.
क्रांतीभूमी मराठी न्यूज
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या परवानगीने चालणाऱ्या मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी मुळे अत्यंत दुर्दैवी आणि *माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडली.* कष्टकरी शेतकरी ठेवीदार सुरेश जाधव यांनी कष्टाचा पैसा मिळत नाही म्हणून छत्रपती मल्टीस्टेट मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
*छत्रपती मल्टीस्टेटचे संतोष भंडारी म्हणजे गुन्हेगारी राजकीय टोळीतील दुसरा कराडच आहे.* ज्याप्रमाणे स्वर्गीय संतोष देशमुखचा भ्रष्ट राजकीय गुंडा ने बळी घेतला. त्याचप्रमाणे स्वर्गीय सुरेश जाधवचा राजकीय गुंड असलेल्या व्यक्तीने बळी घेतला आहे.
मराठवाड्यातील भ्रष्ट राजकीय गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे चर्चेत असलेल्या *बीड जिल्ह्यामध्ये लोकशाही शासन नावालाच आहे. तसं पाहता देशातच लोकशाही जवळजवळ संपुष्टातच आलेली आहे. पण बीड जिल्हा म्हणजे गुंडाराज*.
याचा अनुभव आमच्या ठेवीदार शिष्टमंडळाला आला. गेवराई पोलीस स्टेशनचे *पी.आय. बांगर* यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली आहे.सोशल मीडियावर आम्ही व्हायरल करत आहे. त्यांची तक्रार आम्ही मा.पोलीस आयुक्त साहेबाकडे करणार आहे.
दिनांक 21 जून 2025 शनिवारी आम्ही श्री डॉ.एल .बी .सावंत, श्री दिनकरराव उघडे ,श्री.करण मिठे. श्री राधाकृष्ण मैद, श्री आत्माराम शेवाळे, श्री सिताराम घाडगे ठेवीदार आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या भेटीसाठी गेवराई तालुक्यातील खळेगाव येथे गेलो. गावापासून दोन किलोमीटरच्या आसपास
दीड एकर स्वतःच्या मालकीच्या शेतात स्वर्गीय आत्महत्याग्रस्त ठेवीदार सुरेश जाधव साध्या पत्राच्या घरात राहतात. पाऊस आला की अनेक ठिकाणी गळते. घरी वृद्ध आई कमलबाई आजारी, त्यांना स्वतःलाही किडनी स्टोनचा त्रास होता.मुलगी साक्षी बारावी पास दोन वेळेस नीट रिपीट केले.
मल्टीस्टेट ने पैसा दिला नाही म्हणून शहरात चांगल्या क्लासला जाता आले नाही. नाईलाजाने ऑनलाइन क्लास करून अभ्यास केला. मागील वर्षापेक्षा यावेळेस मार्क कमी आले.मुलगा शुभम यावर्षी बारावीला आर्थिक अडचणीमुळे त्यालाही शहरात चांगल्या क्लासला जाता येईना! आपला जन्म कष्ट करण्यात गेला. शेती
गेली तरी चालेल पण मुल शिकली पाहिजे! सुखाने राहिले पाहिजे! म्हणून मुलाच्या शिक्षणासाठी शेती विकली.स्वतःचा कष्टाचा पैसा मिळण्यासाठी पत्नी कविता व सुरेश जाधव मल्टीस्टेटच्या दारी हेलपाटे मारत होते.आपली फसवणूक आर्थिक ची तक्रार देण्यासाठी गेवराई पोलीस स्टेशनला होते. *मल्टीस्टेट पैसा देत नव्हती.खाकी वर्दीतले गुंड पोलीस प्रशासन तक्रार घेत नाही.* दीर्घकालीन न्यायालयीन लढायला *जवळ फुटकी कवडी नाही.* शेवटी भ्रष्ट प्रशासकीय व्यवस्थेन कष्टकरी शेतमजूर, *शेतकऱ्याचा बळी घेतला.*
*मा .केंद्रीय गृहमंत्री अमितशाहा यांच्याकडे असलेल्या केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या परवानगीने मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा कारभार चालतो. आर्थिक व्यवहार करण्यासाठी शासन परवानगी देते तर तर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शासनाचीच आहे.*
मराठवाड्यात दुष्काळग्रस्त असल्यामुळे शेतकरी आत्महत्याच प्रमाण जास्त आहे. अन्यायग्रस्त ठेवीदारांचा आत्महत्याच सूत्र सुरू झालेलं आहे.मराठवाड्यातील सर्वच मल्टीस्टेट दोन वर्षापासून जवळपास सर्व मल्टीस्टेट बंद आहे. कष्टाचा पैसा मिळत नाही म्हणून अनेक ठेवीदार मानसिक दृष्ट्या खचून मेले! *मा .शहाजीची चाणक्य नीति .सर्वसामान्य माणसा जीव घेणार किती ?* महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी यांच्याकडे असलेल्या ग्रह खात्याचे भ्रष्ट पोलीस प्रशासन ठेवीदाराच्या आर्थिक तक्रारी घेतच नाही. दोन्ही गृहमंत्र्याचे चुकीचे धोरण. ठेवीदारांच्या आत्महत्याच कारण ठरत आहे. भ्रष्ट राजकीय प्रवृत्तीमुळे शासकीय धोरणच सर्वसामान्य माणसाच्या मरणाच सरण रचत रचत आहे.
✍️
भगवान रेगुडे .
संयोजक
सर्व ठेवीदार न्याय कृती समिती. महाराष्ट्र राज्य
Leave a Reply