अंबड येथे रास्ता रोको आंदोलन, पोलिसांनी आंदोलन करणारे घेतले ताब्यात..
क्रांतीभूमी मराठी न्यूज: अंबड येथे तहसील कार्यालय समोर मल्टिस्टेट ठेवीदारांचे रास्ता रोको आंदोलन सुरू होते ,शासनाचे प्रतिनिधी कोणीच येत नसल्यामुळे आंदोलन कर्त्यांनी घोषणा बाजी केली, शांत सुरू असणारे आंदोलन पोलिस प्रशासन यांनी मोडीत काढत आंदोलन करते त्यांना ताब्यात घेतले, अंबड येथे आठवडी बाजार असल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती, लांबच लांब रांगा वाहनाच्या लागल्या होत्या. पोलिस प्रशासन यांनी दबाव टाकत नागरिकन बाजूला केले व सुरू असलेले आंदोलन मोडीत काढले , असा हुकूमशाही व्यवस्थेला कोण जबाब विचारणार असा प्रश्न उपस्थित नागरिकांना निर्मिण झाला . एकीकडे बँक पैसे देत नाही तर दुसरी कडे न्याय मागण्यासाठी कोणाकडे जावे असा सवाल उपस्थित होतो.त्यावेळी रेगुडे सर, डॉ. सावंत, दिनकर उघडे आदी ठेवीदार उपस्थित होते..
अंबड येथे रास्ता रोको आंदोलन, पोलिसांनी आंदोलन करणारे घेतले ताब्यात..

Leave a Reply