प्रा.सुमित पवार यांची राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाच्या विभागीय अध्यक्ष पदी निवड
राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाच्या महाविद्यालयीन विंगच्या जिल्हाध्यक्ष पदी शरद वर्हेकर
अमरावती प्रतिनिधी : दि.२७- राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य च्या अमरावती जिल्हा स्तरीय बैठकीत सर्वानुमते विदर्भ विभागीय अध्यक्ष म्हणून प्रा.श्री.सुमित पवार यांची तर प्रा.शरद वर्हेकर यांची महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या अमरावती जिल्हा अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. शहरातील क्षत्रिय माळी बोर्डिंगमध्ये श्रीमती मंदाकिनी निमकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाची बैठक पार पडली.यावेळी महासंघाचे राज्य सरचिटणीस श्री संतोष भोजने ,वि.दा.पवार,प्रा.शरद वर्हेकर,इंमास चे वासुदेवराव चौधरी,प्रा.रुपेश फसाटे,प्रा.सुमित पवार, श्री गणेशराव मानकर यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.राष्ट्रीय ओबीसी बहुजन संघ हा राज्यातील केजी टू पीजी आशा सर्व ओबीसी व्ही जे एन टी एस बी सी व वंचित बहुजन शिक्षक बांधवांना एकत्रित करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन दरबारी त्यावर करायच्या उपाययोजना याबाबतीत सखोल चर्चा आणि मार्गदर्शन यावेळी श्री संतोष भोजने यांनी उपस्थित बांधवांना केलें.ओबीसी बांधवांनी भविष्यातील संकटाचा वेध घेऊन शिक्षक, शिक्षण आणि विद्यार्थी यांना योग्य न्याय मिळावा यासाठी सर्वांनी एकत्रित यावे असे आवाहन इमास चे समन्वयक श्री वासुदेव चौधरी यांनी केले.
प्रा.रुपेश फसाटे यांनी जास्तीत जास्त संख्येने या लढाईत ओबीसी बहुजन शिक्षक बांधवांना आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.विभागिय अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल सुमित पवार यांनी उपस्थितांचे आभार मानत भविष्यात संघटना संपूर्ण विदर्भात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.प्रा.शरद वर्हेकर यांनीही अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत महाविद्यालयीन प्राध्यापकांना एकत्र करून मानसन्मान मिळवत आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे काम महासंघाचे मार्फत करण्यात येईल असे आश्वासन दिले.लवकरच जिल्ह्यातील बांधवांना एकत्रित करून जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित विनाअनुदानित स्वयंअर्थसाहित या विभागासाठी जिल्हा अध्यक्ष नेमणूक करण्यात येइल.समाजासाठी लढणारे स्वाभिमानी नेतृत्व विकसित करण्याचे यावेळी ठरले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा शरद वरेकर यांनी तर आभार प्रदर्शन श्री वि.दा.पवार यांनी मानलें.
Leave a Reply