पोलिसाचा पाठलाग… वाहनाला धडक… चाकूचे २० वार… सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची निघृण हत्या !

अमरावती : पोलिसाचा पाठलाग… वाहनाला धडक… चाकूचे २० वार… सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची निघृण हत्या !

अमरावती प्रतिनिधी : ( गणेश मानकर ) शहरात गुन्हेगारीला आळा घालण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या पोलिसाचाच निघृण खून झाल्याने अमरावतीत खळबळ उडाली आहे. वलगाव पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर कार्यरत असलेले अब्दुल कलाम अब्दुल नबी (वय 57, राहणार टीचर कॉलनी, अमरावती) यांची शनिवारी संध्याकाळी आधी अपघात करून आणला नंतर सहा ते सात अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेतील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नवसारी टी पॉईंटवर हल्ला

गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या नवसारी टी पॉईंटजवळ शनिवारी (ता. २८) संध्याकाळी हा थरकाप उडवणारा प्रकार घडला. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी भेट देऊन तपशील जाणून घेतला. आरोपींच्या मागावर वेगवेगळ्या पथकांना रवाना करण्यात आले आहे. तर आता आलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट एक ने अवघ्या सहा तासात आरोपींना अटक केली आहे. झियाउद्दीन एहसानुद्दीन (अराफत कॉलनी), अवेज खान अयुब खान (दर्यापूर) यांनी हत्येची कबुली दिली असल्याची माहिती मिळत आहे. तिसरा आरोपी फाजिल उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल असल्याचे वृत्त आहे.

कसा झाला हल्ला?

अब्दुल कलाम हे शनिवारी सायंकाळी घरून पोलीस स्टेशनकडे निघाले होते. त्याच दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांचा पाठलाग केला. काही अंतरावर त्यांच्या वाहनाला जोरदार धडक देण्यात आली. अपघातात ते खाली पडताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर एकाहून अधिक वेळा चाकूने वार केले. १५-२० वार, सहा-सात हल्लखाr पोलीस तपासात अब्दुल कलाम यांच्या शरीरावर १५ ते २० वार झाल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात सहा ते सात अज्ञात व्यक्ती सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे. इतक्या क्रूर पद्धतीने एएसआयची हत्या झाल्याने पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे.

हत्या का केली?

प्राथमिक तपासात या हत्येमागे काही कौटुंबिक किंवा आर्थिक व्यवहाराचे वाद असल्याचा संशय पोलिसांना आहे. या दृष्टीने पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. एक आरोपी अटकेत असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलीस कर्मचारीच सुरक्षित नाहीत तर नागरिकांचे काय, असा सवाल सध्या अमरावतीकर विचारत आहेत. शहरात गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *