आता लढाई आरपारची आणि अंतिम मनोज जरांगे पाटील
क्रांतीभूमी मराठी न्यूज : – मागील दोन वर्षापासून आपण ही आरक्षणाची लढाई लढत आहे आता मराठ्यांनीच मैदान गाजायच आणि मराठ्यांनीच आपल्या मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर विजयाचा गुलाल मराठ्यांनीच टाकायचा, दोन वर्षाची लढाई आणि संघर्ष आता मराठ्यांनी जिंकायचे म्हणजे जिंकायचं. आपल्या जातीसाठी ना आपल्या लेकरासाठी आपण भरभर करायची कोणीही मागे हटणार नाही, मागील ७५ वर्षापासून वाट बघतोय मराठा समाज आरक्षणाची आता वेळ आलीये आरक्षण घेण्याची, आरक्षणाची शेवट बैठक असल्याकारणाने गावकऱ्याचे विनंतीला मान देऊन अंतर्वली सराटी गावातच बैठक ठेवण्यात आली असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
या आरक्षणाची लढाईमुळे ५८लाख नोंदी मराठ्याचे पदरात पडले आणि तब्बल चार कोटी मराठे आरक्षणात गेले. २७ ऑगस्ट ला अंतरवाली सराटी येथून निघणार २९ ऑगस्ट ला मुम्बई ला जायचं..दोन दिवस , दोन रात्रीत मुम्बई जायचं.मुंबई ला जाण्याचा मार्ग बदणार जरांगे पाटील . आरक्षण घेतल्या शिवाय माघार घेणार नाही , आरक्षण हे ओबीसी तूनच घेणार , मुंबई ला शांततेत जायचं , मराठाच्या पोराला काढी लागली तर महाराष्ट्र पूर्ण जाम केला जाईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकाराला दिला आहे.
Leave a Reply