घुंगर्डे हादगाव येथील खंडोबा मंदीर ते स्मशानभूमी रस्ता निकृष्ट
क्रांतीभूमी मराठी न्यूज,
प्रतिनिधी : – अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील खंडोबा मंदीर ते स्मशानभूमी रस्त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. घुंगर्डे हादगाव येथील खंडोबा मंदीर ते स्मशानभूमी सिमेंट रस्त्याचे काम हे एक महिन्या पुर्वी काम झाले परंतु संबंधित गुत्तेदार यांनी हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले असुन इसटीमेट नुसार हे काम केले नाही व सिमेंट व खडी चे प्रमाण ही खुप कमी वापरण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांनी ग्राम विस्तार अधिकारी यांना के के कलयाणकर यांना निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले आहे की या रोड ची चौकशी करण्यात यावी व या कामाचे बील देऊ नाही नसता गावकरी ग्रामपंचायत समोर उपोषण करण्यात येईल. या निवेदनावर गजानन शिंगटे, निवास मस्के, शरद परीहार, संदीप परीहार, भारतसिंग पवार, शारवण सिंग ठाकुर, संदीप पवार, प्रल्हाद शिंदे, किशोर पवार, नारायण जोडणार, संतोष काकडे, संभाजी मोटे, किसना थोरात, किसना चोरमले, पमा महाराज परीहार, हरून शेख, अर्जुन जाधव, सुरज मस्के, बंडु शिंगटे , गोटया जोडणार सह आदी नागरीकांच्या सह्या आहेत.
Leave a Reply