महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या नागपूर जिल्हाध्यक्ष पदी भुषण कुंटे यांची नियुक्ती,

महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या नागपूर जिल्हाध्यक्ष पदी भुषण कुंटे यांची नियुक्ती,

 

क्रांतीभूमी मराठी न्यूज,

प्रतिनिधी:- राज्यात महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस कार्य करण्यात येत असून या कार्यात अधिकाधिक भर पडावी यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नियुक्त्या देण्यात येत आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताना दिसून येत आहे.अवकाळी पावसामुळे,बोगस बियाणे, खते व प्रशासनच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व त्यांना सामाजिक,आर्थिक, कायदेशीर ज्ञान प्राप्त व्हावे शेतकरी संघटित व्हावे याकरिता उपराजधानी नागपूर येथील भुषण हरिभाऊ कुंटे यांची नागपूर जिल्हाध्यक्ष म्हणून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी आज रोजी नियुक्तीपत्र दिले.

भूषण कुंटे हे एक बहुआयामी आणि प्रेरणादायक व्यक्तिमत्व आहे. यशस्वी उद्योजक, लेखक, कायद्यातील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नाविन्यपूर्ण शेतकरी अशा विविध भूमिकांमधून त्यांनी तंत्रज्ञान, शेती, कायदा, शिक्षण आणि सामाजिक सेवा या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे.भूषण कुंटे (B.Sc., MBA, B.Ed.) सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, नागपूर (मुख्य शाखा) येथे ३ वर्षांची LL.B. पदवीचा तिसरा सत्र पूर्ण करत आहेत. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध विषयांवर संशोधन लेख प्रकाशित केले आहेत तसेच प्रगत आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून भूषण कुंटे हे एक प्रगत आणि प्रयोगशील शेतकरी म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून संत्रा, तूर, गहू, कापूस, हरभरा व सोयाबीन या पिकांचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.

शेतकऱ्यांचा सर्वांनी विकास हाच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे म्हणून मी संघटनेला पूर्ण वेळ देणार आहेत.

आपण एक शेतकरी पुत्र असून आपण शेती व शेतकऱ्यांच्या हितासाठी परिसरातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणे कामी काम करण्यासाठी नागपूर जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात येत असल्याचा उल्लेख असून संघटनेला मजबूत करण्यासाठी संघटनेचे ध्येय धोरणे व विचार सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार वर्ग यांच्यापर्यंत पोहचून शेतकरी हीत जपणार अशी अपेक्षा राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांनी व्यक्त करून पुढील कार्यकारणी पंधरा दिवसाच्या आत घोषित करून संघटनेच्या कार्यालयात पाठवावी असे नमूद केलेले आहे तसेच ज्यांना ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेत सामील होऊन शेतकऱ्यांसाठी कार्य करायचे असेल अशांनी 9890875238 या नंबरवर संपर्क करावा असे सांगितले.

संघटनेचे सर्व कार्यकर्ते सदस्य, पदाधिकारी व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी निवडीबद्दल अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *