मराठवाड्यात आता मुलींसाठी मोफत वेद पाठशाळा
_________________
क्रांतिकारी समाज परिवर्तन चळवळीत रामानंदाचार्य नरेंद्रचार्य एक पाऊल पुढे
_________________
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी बबन घोडे
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांच्या पुढाकाराने श्री क्षेत्र नाणिजधाम येथे सर्व जाती धर्मातील युवकांसाठी मोफत वेद पाठशाळा यशस्वी रित्या संपन्न होऊन अनेक युवक पुरोहिताचे अध्ययन पूर्ण करून संस्कारी जीवन जगत हे शिक्षण त्यांच्या उपजीविकेचे साधन ही बनले आहे.
आता मुलींनाही वेदशास्त्राचे मोफत शिक्षण देण्यासाठी रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांनी पुढाकार घेतला आहे.
याच अनुषंगाने दि.7 जुलै २०२५ रोजी परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र माऊली माहेर या पवित्र पावन भूमीत
मुलींसाठीच्या मोफत वेद पाठशाळेची उद्घाटन होत आहे.
भारतीय जनता पार्टीचे नूतन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री रविंद्रजी चव्हाण पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर आमदार विटेकर यांच्यासह मराठवाड्यातील अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित असणार आहे
या आगळ्यावेगळ्या मुलींसाठीच्या वेद पाठशाळासाठी आयोजित या शुभारंभ प्रसंगी हजारो शिष्य भक्त यावेळी उपस्थित राहणार आहेत.
जगद्गुरु रामानंदाचार्यजी यांच्या या क्रांतिकारी समाज सेवा चे सर्वत्र कौतुक होत आहे._
Leave a Reply