सुतार समाजातील गुणवंतांचा होणार गौरव
जालना जिल्हा सुतार समाजाच्या वतीने यावर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. समाजातील शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि समाजात शिक्षणाचे महत्त्व वाढावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शनिवार, ५ जुलै रोजी शहरात राजेश भालेकर यांच्या कार्यालयात एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला पंडित दांडगे, अशोक इंगळे, प्रा. विजय सुरासे, डॉ. यशवंत सोनुने, निवृत्ती भालेकर, शाम जाधव, भगवान सागुळे, भिकनराव हिवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा गौरव समारंभ ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी, शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळवणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवणारे विद्यार्थी, नीट, जेईई आणि इतर परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षणशास्त्र पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी आणि समाजातील इतर
गुणवंतांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील सुतार समाजातील सर्व गुणवंतांनी आपल्या प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह २५ जुलैपर्यंत आपली नावनोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा सुतार समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी जालना येथे राजेश भालेकर ( ९८२३६०६१११), विजय सुरासे, शाम जाधव, निवृत्ती भालेकर, ज्ञानेश्वर मानतकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुकास्तरावर नाव नोंदणीचे आवाहन
परतूर येथे बालाजी सागुळे, सुशील सागुळे, दयानंद सागुळे; भोकरदन येथे गणेश इंगळे; जाफ्राबाद येथे रमेश इंगळे, विनोद इंगळे; बदनापूर येथे गणेश आढाव; मंठा येथे बालाजी सागुळे, गजानन सागुळे यांच्याकडेही नावनोंदणी करता येणार आहे.
Leave a Reply