पलूस कडेगाव च्या विकासासाठी कटिबद्ध मा, संग्रामसिंह देशमुख

पलूस कडेगाव च्या विकासासाठी कटिबद्ध मा, संग्रामसिंह देशमुख

कडेगाव प्रतिनिधी :
अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या विकास व दलित वस्ती सुधारणा करणे योजने अंतर्गत पलूस कडेगाव मतदार संघातील विविध विकास कामांसाठी १ कोटी ४५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम संपतराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संग्राम देशमुख म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार सर्वसामान्य जनतेचा उत्कर्ष साधण्याचे काम करत आहे, पलूस कडेगाव मतदार संघातील प्रत्येक गावाचा सर्वांनी विकास साधण्यासाठी आपण कटिबध्द आहोत असा कोणता विभाग नाही ज्याचा निधी पलूस कडेगाव मतदारसंघासाठी आपल्या युती सरकारच्या माध्यमातून मिळाला नाही.

मतदार संघाचा नियोजनबध्द विकास साधण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे विकास कामांसाठी केलेल्या मागणीनुसार पलूस तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर घोगाव येथील बौध्द विहार परिसरात रस्ता काँक्रिटीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसविणे १० लक्ष, प्रबुध्दनगर नागराळे येथे रामभाऊ जाधव घर ते संतोष जाधव घर बंदिस्त गटार ५ लक्ष, वसंतनगर दुधोंडी येथे दाभडे वस्ती काँक्रिटीकरणासह पेव्हिंग ब्लॉक बसवणे ५ लक्ष, चर्मकार वस्ती सांडगेवाडी येथील प्रकाश शिंदे घर ते अर्जुन यादव घर काँक्रिटीकरण करणे ५ लक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर नागठाणे येथील उदय बनसोडे घर ते झुंजार पाटील घर रस्ता व बंदिस्त गटारी सह काँक्रिटीकरण करणे ५ लक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बांबवडे येथील विजय कांबळे घरटे बौध्द समाज मंदिर दोन्ही बाजू गटारीवर आरसीसी प्लेट बसविणे ५ लक्ष, निकाळजे गल्ली रामानंदनगर येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे ५ लक्ष, आवळे कर गल्ली रामानंदनगर ते कांबळे वस्ती बंदिस्त गटार बांधणे ५ लक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर वसगडे येथील समीर संजय सावंत घर ते राजेंद्र सावंत घरापर्यंत बंदिस्त गटर व कॉक्रिटीकरण करणे १० लक्ष

सिध्दार्थनगर बुलों येथील श्रीधर चव्हाण घर ते संतोष कुंभार जम्बु चौगुले घरापर्यंत काँक्रिटीकरण करणे १० लक्ष, संत रोहिदास नगर धनगाव येथील रोकडे वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लक्ष, अण्णाभाऊ साठेनगर, माळवाडी येथील तात्यासो वायदंडे घर ते कबीर वायदंडे घर रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लक्ष,

कडेगाव तालुक्यातील आंबेडकरनगर कडेपूर येथे गटर बांधकाम करणे व आरसीसी बंदिस्त गटार बांधणे १८ लक्ष, संपतराव देशमुखनगर कडेपूर येथे अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे १० लक्ष, सरोजनी देशमुख नगर कडेपूर येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे ४ लक्ष, छत्रपती संभाजी राजे चौक येथे अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे १६ लक्ष, स्वामी विवेकानंदनगर कडेपूर येथे गटार बांधकाम करणे व आरसीसी बंदिस्त गटार बांधणे ५ लक्ष, आंबेडकरनगर तोंडोली येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे व बंदिस्त गटार बांधणे ७ लक्ष असा १ कोटीचा ४५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे संग्राम देशमुख यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *