बोगस घरकुल बांधकामाची चौकशी करण्याची वंचीत बहुजन आघाडीची मागणी…
क्रांतीभूमी मराठी न्यूज
अंबड :- अंबड तालुक्यातील धाकलगाव सर्कल मधील विविध घरकुल योजनेतील बोगस घरकुल बांधकामाची चौकशी करण्याची मागणी वंचीत बहुजन आघाडी ने गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
अंबड तालुक्यातील धाकलगाव सर्कल मधील रमाई आवास घरकुल योजना, पंतप्रधान आवास घरकुल योजना अशा विविध घरकुल योजनेतील पंचायत समिती कार्यालय अंबड येथील घरकुल बांधकाम अभीयंता जे.एस.पिसुळे यांनी घरकुल लाभार्थ्यां कडुन आर्थिक देवाणघेवाण करून नियमानुसार घराचे कुठलीही काम न करता तसेच जुने घरे दाखवुन पैसे उकळले आहेत तसेच ज्या लाभार्थ्यांनी अभीयंता यास पैसे दिले नाहीत त्या लाभार्थ्यांने घराचे काम करून देखील मागील चार ते पाच महीन्यापासुन त्या घरकुल लाभार्थ्यांना घरकुल
अनुदानाचे पैसे जाणीवपूर्वक न टाकल्याचा आरोप वंचीत बहुजन आघाडी च्या वतीने गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय अंबड यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
तसेच घरकुल बांधकाम अभीयंता जे.एस.पिसुळे यांच्या कार्यकाळात ज्या घराचे बांधकाम झाल्याचे दाखवुन पैसे उचलन्यात आले आहेत त्या सर्व घरांची स्थळ पाहणी करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.नसता वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर वंचीत बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष किशोर तुपे, सिध्दार्थ उघडे, मुकेश डुचे,लक्ष्मण उघडे,अकाश उघडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत..
Leave a Reply