पारंपारिक गणेश उत्सवास आज पासून शुभारंभ…
अवघ्या महाराष्ट्रात गणरायाच्या आगमनाप्रसंगी प्रचंड उत्साह…
क्रांतिभूमी मराठी न्यूज,
बबन घोडे.. छत्रपती संभाजी नगर
…. समस्त देशवासीयांचे आराध्य दैवत असलेले. श्री गणरायांचे आज सर्वत्र ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत गुलाल उधळीत आगमन होणार आहे.
गणरायाच्या आगमना पूर्वी समस्त भाविका मध्ये मंगलमय वातावरण निर्माण झाले असून
छत्रपती संभाजी नगरातील चौका चौकात भव्य दिव्य विशाल गणरायाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.
विविध गणेश मंडळाच्या वतीने या निमित्ताने अनेक आकर्षक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सजीव व निर्जीव देखावे पूर्वीपासून छत्रपती संभाजी नगराची एक नवीन ओळख निर्माण करत आहे.
यंदा गणेशोत्सवावर पावसाचे सावट असल्याने भाविकांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.
सोबतच शहरातील अनेक रस्त्यावर जेसीबी द्वारे खोदकाम सुरू असल्याने व रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकाची त्रेधा उडत आहे. बीड बायपास वरून शहराला जोडणाऱ्या मुख्य शिवाजीनगर भुयारी मार्ग व शहानुर मिया दर्गा उडान पूल येथे वाहतुकीची कोंडी सतत डोकेदुखी ठरत आहे.
रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण मोहिमेच्या पाडापाडी मुळे उदासीनता ही दिसून येत आहे.
यंदा गणेशोत्सवात डीजेवर बंदी असल्याने
युवा वर्गात काहीशी नाराजी दिसून येत आहे. ढोल ताशा बँड या पारंपरिक वाद्यांना यंदा अग्रस्थान असणार आहे.
दहीहंडीच्या गोविंदा सारखी शहरात विविध ढोल पथके मागील महिनाभरापासून सराव करीत असून आज ते प्रत्यक्ष प्रात्यक्षिक असल्याने एक वेगळाच थरार अनुभवास मिळणार आहे.
Leave a Reply