हसनापुर येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप
क्रांतिभूमी मराठी न्यूज,
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथुनच जवळच असलेल्या हसनापुर येथील ग्रामस्थांनी आज सकाळी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलुप. सविस्तर माहीती अशी की, हसनापुर येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत शाळा आहे. परंतु गेल्या एक वर्षापासून तेथे एकच शिक्षक असुन विद्यार्थी संख्या 43 आहे. यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सरपंच यांनी विस्तार अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की जो पर्यंत शाळेवर कायम शिक्षकाची नियुक्ती करणारं नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नसल्याचे सरपंच नितीन मिरकड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत मिरकड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे असे ग्रामस्थांनी सांगितले. विस्तार अधिकारी दिनेश शिनगारे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता तात्पुरती शिक्षकाची नियुक्ती देतो असे विस्तार अधिकारी यांनी सांगितले. परंतु ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही असा पवित्रा सरपंच व ग्रामस्थांनी घेतला आहे.यावेळी सरपंच नितीन मिरकड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत मिरकड, नारायण सातपुते, तुकाराम सातपुते, किशोर पठाडे, संतोष मिरकड, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply