पावसाळी अधिवेशनात तालिका सभाअध्यक्ष म्हणून आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी सांभाळले कामकाज
सभागृह चालवितांना संसदीय अनुभव , शिस्त , संयम व सद्द्विवेक बुद्धीचा देखील घडवून दिला प्रत्यय
अमरावतीकरांचे ह्रदय अभिमानाने भारावले…
अमरावती (प्रतिनिधी ) गणेशराव मानकर दिनांक -६ जुलै :- राज्यविधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२५ ला ३० जुनपासून मुंबई येथे सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका सभाअध्यक्ष म्हणून जेष्ठ विधानसभा सदस्य आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या नावाची घोषणा केली. अशातच आजच्या दिनांक ०३ जुलै २०२५ रोजीच्या कामकाजादरम्यान विद्यमान अध्यक्षाच्या अनुपस्थितीत आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी विधानसभेचे तालिका सभाध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले व सभागृह यशस्वीरित्या चालविले.
महाराष्ट्र विधानसभेत नियम २९३ नुसार महत्त्वाच्या सार्वजनिक मुद्द्यांवर चर्चेचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी सभागृहातील सदस्यांनी शेतकरी विकासाबरोबरच सुखी, समृद्ध, प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्र घडवण्यासाठीच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. हि चर्चा अत्यंत महत्वपूर्ण असतांना तालिका सभाध्यक्ष म्हणून विराजमान आ. सुलभाताई खोडके यांनी चांगल्या तऱ्हेने सभागृह चालविले. त्यांनी नियोजित वेळेत प्रत्येक सदस्यांना बोलण्याची संधी दिली. तसेच सत्ताधारी सदस्यांबरोबरच विरोधी बाकावर बसलेल्या आमदारांचे सुद्धा म्हणणे ऐकून घेतले.
सभागृहाचे कामकाज चालवीत असतांना तालिका सभाध्यक्ष आ. सुलभाताई खोडके यांनी आपल्या प्रदीर्घ संसदीय कामकाजाचा परिचय देऊन अनुभव , शिस्त , संयम व सद्द्विवेक बुद्धीचा देखील प्रत्यय घडवून दिला. अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके या विधानसभेत पीठासीन तालिका सभाध्यक्ष म्हणून विराजित होताच अमरावतीकरांना मोठा अभिमान वाटला.
सांगण्यात येते कि, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात साधारणत:आठ तासांचे कामकाज चालणे अपेक्षित असते . अर्थातच आठ तास पीठासीन अध्यक्ष त्या खुर्चीवर बसून राहू शकत नाहीत. त्यामुळे अध्यक्ष अनुपस्थित असतील तेव्हा सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी तालिका अध्यक्षांचे एक पॅनल तयार करण्यात येते. या पॅनलवर महाराष्ट्र विधानसभेच्या नियम ८ पोट नियम १ अन्वये तालिका सभाध्यक्ष म्हणून आ.सौ. सुलभाताई संजय खोडके विधानसभेचे कामकाज सांभाळत आहेत. विधानसभेचे सभाअध्यक्ष अँड.राहुल नार्वेकर अनुपस्थितीत तालिका सभाअध्यक्ष म्हणून आ.सौ.सुलभाताई संजय खोडके पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सांभाळत आहेत.
Leave a Reply