अवघ्या जगावर घोंगावत य… तापमान वाढीचे संकट….?

अवघ्या जगावर घोंगावत य… तापमान वाढीचे संकट….?

छत्रपती संभाजी नगर..(बबन घोडे)_आपले गाव आपले शहर आपला देश यासह समस्त जगावर सध्या तापमान वाढीचे, (ग्लोबल वार्मिंग,) चे संकट घोंगावत आहे. उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये असह्य दमट वातावरण, तीव्र उष्णतेचे चटके चांगलेच जाणवले.

अवकाळी पाऊस, दुष्काळ हे सर्व तापमान वाढीची देण आहे.

जंगले नाहीसे होऊन पूर्वीप्रमाणे हिरव्यागार निसर्गाचे चित्र आता दिसेनासे झाले आहे. वायु प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

यासाठीच छत्रपती संभाजी नगरात ई वाहनांना शासनातर्फे अनुदान देऊन प्राधान्य दिले जात आहे. सध्या शहरामध्ये सर्वत्र विभागांचा बोलबाला दिसून येत आहे. अनेक ऑटो रिक्षा चालकांनी प्रदूषण मुक्तीच्या लढ्यात सहभागी होत इलेक्ट्रिक रिक्षा खरेदीचा झपाटा लावला आहे.

दुचाकी वाहन खरेदी करतानाही छत्रपती संभाजी नगर कर इ वाहनेच खरेदी करत आहेत.

विशेष म्हणजे. एसटी महामंडळाच्या वतीने इ एस टी बसेस चालवल्या जात आहेत..अर्थात वायू प्रदूषणातून मुक्तीसाठी छत्रपती संभाजी नगर शहर वेगाने पुढे जात आहे. याशिवाय छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेतर्फे प्रदूषण मुक्तीसाठी विविध उपक्रम सतत राबवले जात आहेत.

रस्त्यावर मोठ मोठाले फलक लावून प्रदूषण मुक्ती प्लास्टिक बंदी याविषयी जागरण केले जात आहे

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वसुंधरा पायी दिंडीचे.. पर्यावरण व प्रदूषण मुक्ती संदर्भात जनजागरण करत मुख्यपीठ कोकणाकडे मार्गक्रमण होत असते. यंदा वसुंधरा दिंडीचे तिसरे वर्ष असून महाराष्ट्रातील पुणे नागपूर नाशिक मुंबई परभणी यासह तेलंगणा गोवा येथून दिंड्यांचे प्रस्थान होणार आहे.

अतिशय भक्ती भावपूर्ण वातावरणात संपन्न होणारा समाज जनजागृती करणारा गुरु शिष्य प्रेमाचा हा वसुंधरा दिंडी सोहळा एकदा पहावाच अनुभवावाच…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *