रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेने स्व स्वरूप संप्रदायाची समाजकार्यात गगन भरारी ….
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी बबन घोडे : –
दक्षिण पीठ नाणिजधाम पिठाचे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या दिव्य संकल्पनेतून महाराष्ट्र सह इतर राज्यातही संप्रदायाने समाजकार्यात उल्लेखनीय अशी गगन भरारी घेतली आहे. Ko
मरणोत्तर देहदान, मरणोत्तर अवयव दान, दवाखान्यात अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना ब्लड इन नीड या उपक्रमाच्या माध्यमातून तात्काळ रक्त उपलब्ध करून देणे, प्रत्येक वर्षी महा रक्तदान शिबिर आयोजित करून एक लाखापेक्षा अधिक रक्तपिशवी संकलनाचे कार्य अविरत सुरू आहे.
महाराष्ट्राच्या विविध महामार्गावर अपघात ग्रस्तांसाठी मोफत रुग्णवाहिका कार्यरत असून या माध्यमातून आतापर्यंत हजारो अपघातग्रस्तां ना तात्काळ रुग्णालयापर्यंत पोहोचण्याचे कार्य केले आहे व आताही अविरत सुरूच आहे.
अवघ्या जगावर सध्या ग्लोबल वार्मिंग अर्थात तापमान वाढीचे महा भयानक संकट चालून येत आहे. वृक्ष वाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने वातावरणात जलवायू प्रदूषणामुळे पृथ्वी वरील समस्त प्राणीमात्रांचे जीवन धोक्यात आले आहे. तापमान वाढीच्या व प्रदूषणाच्या समस्येतून मुक्तीसाठी शासन दरबारी प्रयत्न सुरूच आहेत मात्र याही पुढे जात रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज यांनी वसुंधरा पाय दिंडीच्या माध्यमातून ग्लोबल वार्मिंग संदर्भात जन जागरण सुरू केले आहे.
तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा… हे रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांचे ब्रीद वाक्य आहे.
याच अनुषंगाने समाजासाठी अनेक उपक्रम वर्षभर राबविले जात आहेत.
Leave a Reply