शहापूर प्रतिनिधी( अशोक गायकवाड ) : अबंड तालुक्यातील करंजाळा येथे
२१ मार्च रोजी रात्री परमेश्वर बाबुराव शिंदे यांच्या घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातून रोख रक्कम सोन्याचे दागिने, असा ७ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपासा झालेला होता. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून
गोंदी पोलिसांनी या गुन्ह्यातील दरोडा टाकणारा आरोपीलातूर येथून अटक केलेलेली आसून करंजळा दरोडा प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी घटनेचा तपासची चक्र फिरवत तिर्थपुरी ता.घनसावंगी येथील रहिवासी बाळू उर्फ बालूसिंह अमरसिंग टाक याची खात्रीलायक माहिती मिळताच, गोंदी पोलिसांनी पथक तयार करत २९ एप्रिल रोजी लातूर येथून त्याला अटक केली.
मा .अंबड न्यायालयत या आरोपीला हजर करण्यात आलेला असतांना मा.न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली होती. पोलिसांनी चौकशी केलेली असतांना त्यांने आपला गुन्हा कबूल केलेला दरोडा प्रकरणातील त्यांच्याकडून ९० हजार रुपये जप्त करण्यात आलेले आहेत.
या आरोपीविरुद्ध २०२२ मध्ये विवेकानंद चौक लातूर पोलीस ठाण्यात दरोड्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल आसून आरोपींची चौकशी केल्यानंतर गोंदी पोलीस ठाणे हादि्तील तसेच अंबड येथे हि चोरी केल्याची कबुली दिलेली असून या गुन्ह्याचा तपास चालू आहे.
गुन्हेगाराला अटक करण्याची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक किरण हवाले, उपनिरीक्षक बलभीम राऊत,जमादार आशोक नागरगोजे,बामणवात,पोलिस पथकातील पो.का. दीपक भोजने, शाकेर सिद्दीकी, विजय काळे, प्रदीप हवाळे,नितीन खराद,चालक गणेश मुंडे,महिला पोलिस आशा माहुरे,यांनी केले ..
Leave a Reply