मौजपुरी येथे पोकरा प्रकल्प टप्पा क्र.२ चे सूक्ष्म नियोजन ..

मौजपुरी येथे पोकरा प्रकल्प टप्पा क्र.२ चे सूक्ष्म नियोजन ..

रामनगर प्रतिनिधी :- (रामदास गायकवाड)   जालना तालुक्यातील मौजपुरी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, श्री .जी. आर .कापसे, उपविभागीय कृषी अधिकारी, श्री. प्रशांत पवार व तालुका कृषी अधिकारी व्ही जे राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागीय पद्धतीने गावाच्या सूक्ष्म नियोजन करण्याची शुक्रवार रोजी मशाल फेरी काढून सुरुवात करण्यात आली. मंडळ कृषी अधिकारी श्री रवी राठोड यांनी प्रभात फेरी दरम्यान गावातील शेतकऱ्यांसमवेत पोकरा योजनेविषयी जनजागृती केली. नंतर ग्रामपंचायत येथे ग्राम कृषी विकास समिती सदस्य प्रगतशील शेतकरी आणि उपस्थित ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये हवामान अनुकूल लक्ष गट चर्चा करून सर्व ग्रामस्थांनी या प्रकल्पामध्ये सहभाग नोंदवावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी पर्यवेक्षक श्री. विजयकुमार वाघमारे यांनी पाण्याचा ताळेबंद कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक श्री ढगे सर उपस्थित होते. कृषी सहाय्यक श्री सुनिल राठोड यांनी या प्रकल्प अंतर्गत मृदा व जलसंधारणाची कामे, हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब कसा करावा, वैयक्तिक लाभाचे घटक, महिला शेतकरी गट,शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपनी यांना अर्थ सहाय्यक कृषी व्यवसाय कसे करता येईल याचे सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित प्रकल्प समन्वयक श्री गजानन गाढे सर, सरपंच बद्रीनारायण भसांडे, जलदुत श्री रामदास गायकवाड, बालाजी बळप, अंकुश काळे, बळीराम गायकवाड, विजय बळप, मनोहर डोंगरे, भगवान ढोकळे, कृष्णा सावंत, अंकुश दळवे, उध्दव बारड यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *