बारावीचा निकाल उद्या सोमवारी ५ मे रोजी होणार जाहीर..*

4🟥 क्रांतिभूमी मराठी न्युज 🟥

जालना :-राज्यातील बारावीचा निकाल उद्या सोमवारी ५ मे रोजी जाहीर होणार आहे.महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.*

अधिसूचनेनुसार,महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल सोमवारी‌ ५ मे रोजी दुपारी जाहीर केला जाईल. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वरून गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून घ्या..

👉सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.

🟥 तुमचा रोल नंबर आणी आई चे टाका, तुमचा निकाल स्कीन वर दिसेल..लगेच सेव्ह करून प्रिंट काढून घ्या..

🟥 विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे आहे, त्यांच्यासाठी मंडळाने एक महत्त्वाची अट घातली आहे. “फेब्रुवारी-मार्च २०२५ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील.” याचा अर्थ, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची झेरॉक्स घेणे आवश्यक आहे.

🟥 परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते ११ मार्च २०२५ या कालावधीत सुरळीतपणे पार पडली होती. यावर्षी राज्यभरातून तब्बल १५ लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यानंतर आता नुकतंच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (Maharashtra HSC 12th result) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, बोर्डाद्वारे निकालाची तयारी पूर्ण झाली असून, तो सोमवारी निश्चित वेळेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाईल.

खालील साईट वापरून निकाल बघू शकता..
mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in

👉  क्रांतिभूमी मराठी न्युज कडून सर्वांना शुभेच्या 💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *