राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत बारसवाडा शाळेत व्याख्यान
बारासवाडा प्रतिनिधी (पंढरीनाथ माळकरी). राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्य बारसवाडा शाळेमध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉ. शुभम मिठे यांनी विद्यार्थ्यासोबत (दि.६) रोजी संवाद साधून मार्गदर्शन केले.
केंद्र सरकारतर्फे दरवर्षी एक ते सात सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो. ‘चांगल्या जीवनासाठी योग्य खा’ ही यावर्षीची थीम आहे या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये पोषण, संतुलित आहार, स्वच्छता, आरोग्य, याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारसवाडा केंद्र डोणगाव तालुका अंबड येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानामध्ये डॉक्टर शुभम मिठे यांनी संतुलित आहार कसा असावा,अन्नघटकाचे महत्त्व,पुरेशी झोप व विश्रांती,आहाराच्या योग्य सवयी,पाण्याचे महत्त्व,जंक फूडचे तोटे याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी मध्यान्ह भोजन योजनेचा लोगो विद्यार्थ्यांनी रांगोळीतून रेखाटला होता.यावेळी शाळेतील शिक्षक,विद्यार्थी यांची उपस्थिती होती.या उपक्रमाचे अंबड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी दिनेश शिनगारे, केंद्रप्रमुख रामेश्वर आंबटकर,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राधाकिसन सावंत यांनी कौतुक केले आहे.
Leave a Reply