दोन दिवसात बंधाऱ्यात पाणी सोडा, नसता ७ मे रोजी तीव्र आंदोलन
जालना: अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील गावांमध्ये दुष्काळाची दाहकता वाढली आहे. पाथरवाला, शहागडं, मंगरूळ, शिवणगाव, जोगलादेवी येथील बंधारे पूर्णपणे कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. अशा स्थितीत पाटबंधारे विभाग पाणी सोडण्यास टाळाटाळ करत आहे. दोन दिवसांपूर्वी उजव्या कालव्याची सीआरगेट उघडून पाणी खुली करणारे सतीश घाडगे यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत निर्वानेचा इशारा दिला आहे दोन दिवसात अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील बंधाऱ्यांमध्ये पाणी न सोडल्यास सात मे रोजी शेतकऱ्यांसोबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.
अंबड घनसांगी तालुक्यातील गोदाकाच्या गावाततील शेतकऱ्यांची पिके आणि फळबागा उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याअभावी जळून खाक होत आहे.जनावरांना चारा आणि पाणी मिळत नसल्याने त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दोन दिवसांपूर्वी संतप्त शेतकऱ्यांनी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली उजव्या कालव्याचे सी.आर. गेट उघडून प्रशासनाला आपल्या असंतोषाची झलक दाखवली. त्यानंतरही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याच्या हालचाली केल्या नाही.
या गंभीर परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या गोदाकाठच्या शेतकऱ्यांसाठी सतीश घाटगे यांनी सोमवारी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. जर येत्या दोन दिवसांत जायकवाडीच्या उजव्या व डाव्या कालव्यातून या बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्याचे आदेश निर्गमित केले नाही,तर दोन्ही तालुक्यातील हजारो शेतकरी येत्या ७ मे रोजी जायकवाडी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. यावेळी भाजपा तालुका प्रमुख शिवाजी मोरे, पुरुषोत्तम उढाण , राजेंद्र छल्लारे उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या या मागणीवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply