अचानक आलेल्या पावसामुळे शहरात जनजीवन विस्कळीत
जालना प्रतिनिधी : हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी जालना जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे अचानक आलेले वादळी वाऱ्यासह गारपीट चे प्रमाण बदनापूर तालुक्यात सर्वाधिक जास्ती झाल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे फळ बागायत भाजपाला मिरची टोमॅटो उन्हाळी बाजरी याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची दिसते.
आज सायंकाळी अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. काही दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने काहीसा दिलासा दिला असला, तरी वाहतूक कोंडी व किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढले.
स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी सांगितले की पावसामुळे अचानक दुकानांमध्ये पाणी घुसले. अनेक दुचाकीस्वार आणि पादचारी आडोशाला थांबून पाऊस थांबण्याची वाट पाहत होते.
महायुती सरकार सतेत येणापूर्वी शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते.आश्वासन पूर्ण झाले च नाही परंतु शेतकऱ्याच्या तोंडा समोरील घास आजच्या वाद्ळी वाऱ्यासह पासून आणी गारपीट हिसकून घेतला असे म्हणावे लागेल..झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे..
सलग दुसऱ्या दिवशी मेघगर्जना सह सुसाट वारा वाहत होता त्यामुळे घरा वरचे पत्रे , शेतातील जनावरचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे, सदरील नुकसान चे तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
Leave a Reply