पावसाचा धडाका, पिकांना तडाखा
पिठोरी शिरसगाव येथील बाजरीच्या ढिगाऱ्याला आली कोम..
क्रांतीभूमी मराठी न्युज,
ग्राउंड रिपोर्ट ( मुकेश डुचे) :- राज्यात माघील दहा दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे, मोठ्या कष्टाने फुलवलेल्या शेतशिवारावर अस्मानी संकटाने कहर केला आहे. . पिठोरी सिरसगाव येथील शेतकरी श्रीपाद सुधाकर शेवतकर यांनी दोन एकर उन्हाळी बाजरी पेरली होती,बाजरी काढून झाकून ठेवली पण सलग पाऊस आल्याने बाजरी ला कोम फुटली आहे,तसेंच हातातोंडाशी आलेल्या पिकाचे डोळ्यादेखत बेमोसमी झालेल्या मुसळधार पावसाने नुकसान पाहण्याचे दुर्भाग्य शेतकऱ्याच्या नशिबी आले आहे. यावर्षी मे महिन्यातच अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने बाजरी,मका,कांदा यासारख्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हाता तोंडाशी आलेले पिक पूर्ण खराब झाले आहे. तसेच फळबागायत दार शेतकऱ्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिठोरी शिरसगाव, वडीगोद्री, धाकलगाव, करंजळा येथे बाजरी,मका,कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे तरी शासनाने याची दखल घेऊन तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावी व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
Leave a Reply