जालना जिल्ह्यातून ॲनिमियामुक्त :- गाव करण्यासाठी शहापूर ग्रामपंचायतची निवड..
प्रतिनिधी शहापूर :- ( सिद्धार्थ उघडे) यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) ,जिल्हा परिषद जालना पंचायत समिती अंबड तसेच सहायक ट्रस्ट च्या वतीने महिला स्नेही गाव संकल्पने अंतर्गत अंबड तालुक्यातील शहापूर हे गाव ऑनिमियामुक्त करण्यासाठी जालना जिल्ह्यातून एकमेव शहापूर ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे.आज शहापूर ग्रामपंचायत कार्यालय येथे अनिमिया मुक्त गाव करण्यासाठी नियोजन बैठक घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या बैठकीला यशदा मार्फत सहायक ट्रस्टचे प्रशिक्षक तसेच कार्यक्रम समन्वयक अतिश गायकवाड,सरपंच सौ.मीरा माने,ग्रामविकास अधिकारी बी बी तिडके,यशदाचे प्रवीण प्रशिक्षक संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ,दिनकर शेळके,ज्योती गायकवाड, कांताबाई बोडखे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर शिवानी भांगे उपस्थित होते,
यावेळी सहाय्यक ट्रस्ट समन्वयक आतिश गायकवाड यांनी आरोग्य, पोषण, आहार, परसबागेचे महत्त्व, शरीरामध्ये रक्त कमी होण्याचे दुष्परिणाम, पांढऱ्या पेशी व लाल पेशी याबद्दल माहिती दिली.अॅनिमियाचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर सेंद्रिय पोषण परसबागेची निर्मिती आपल्याला करावी लागेल. त्यातील पालेभाज्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यशदाचे प्रवीण प्रशिक्षक जिल्हा समन्वयक विष्णू पिवळ म्हणाले की यशदाच्या सहकाऱ्याने क्रांतीसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दरेगाव वतीने या एक ते दीड वर्षात गावातील महिलांच्या रक्तवाढीसाठी वार्षिक नियोजन, यात हिमोग्लोबिन तपासणी, आरोग्य, पोषण आणि सेंद्रिय पोषण परसबाग निर्मितीवर प्रशिक्षण, भिंती रंगविणे, गावात होणाऱ्या स्पर्धा, त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा आराखडा, तसेच यात शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उमेद महिलाना प्रशिक्षण देऊन तसेच वेगवेगळे उपक्रम राबवून रक्तातील ऑक्सिजन वाढीसाठी प्रयत्न होणार आहेत.
बैठकीच्या शेवटी गावाचे सरपंच सौ.मीरा माने यांनी जिल्ह्यातून फक्त आमचे शहापूर एकच गाव या कार्यक्रमासाठी निवडले असल्याने अभिमान व्यक्त करत आता जबाबदारी घेऊन गाव ॲनिमिया मुक्त करू असे जाहीर केले.
बैठकीस उपस्थित गावातील कार्यरत आय सी आर पी आम्रपाली उघडे ग्राम संघाचे अध्यक्ष व सचिव, प्रभाग प्रमुख, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका ,मदतनीस , उमेद प्रभाग समन्वयक,आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply